NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

ठाकरे गटाला झटका ! जिल्ह्यातील नगरसेवक, पदाधिकारी शिवसेनेत

0

ठाणे/एनजीएन नेटवर्क

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नगरसेवक, महिला आघाडीच्या पदाधिकारी, असंख्य कार्यकर्त्यांनी आज (दि.26) धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशाने नाशिक जिल्ह्यात उध्दव ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या पुढाकाराने हा सोहळा पार पडला.

शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी गेल्या आठवड्यात चांदवड दौऱ्यावर असताना ठाकरे गटाच्या अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी त्यांची गुप्त भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. एकच आठवड्यात भाऊसाहेब चौधरी यांनी ठाकरे गटाला धक्का देत असंख्य नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भगवे वादळ आणले आहे. चौधरी यांच्या या रणनीतीचे राजकीय स्तरावरही कौतुक होत आहे.

शिवसेनेचे चांदवड शहर प्रमुख संदीप उगले, चांदवड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष कविता संदीप उगले, नगरसेवक बाळू वाघ, नगरसेवक जगन राऊत यांचे चिरंजीव निखिल राऊत, उपशहरप्रमुख दीपक चंद्रकांत शिरसाट आदी पक्ष पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. याशिवाय उद्धव ठाकरे गटाच्या कळवण तालुका व कळवण शहर महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करून ठाकरे गटाला धक्का दिला आहे. शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्या महिलांत कळवण शहरप्रमुख सत्यवती आहेर, उपशहरप्रमुख वैशाली सोमवंशी, सीमा पगार आणि सुरेखा पगार, शाखाप्रमुख सविता पगार, येवला उपतालुका प्रमुख सोनल, उपतालुका प्रमुख भारती गुजर, गटप्रमुख सुनंदा ऐशी गटप्रमुख, गणप्रमुख प्रतिभा गोसावी, रोहिणी मेंद आणि रेखा जाधव गणप्रमुख हे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी भाऊसाहेब चौधरी यांच्या पुढाकाराने शिवसेनेत यशस्वी वाटचाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.