मखमलाबाद : एनजीएन न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष व सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुजी रूग्णालय नाशिक च्या सौजन्याने शिवस्वराज्य कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ विद्यानगर तर्फे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य महाभियान २०२५ चे आयोजन ज्ञानशारदा सार्वजनिक वाचनालय विद्यानगर मखमलाबाद रोड येथे करण्यात आले होते.
यावेळी सर्व नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मोफत रक्ततपासणी,ब्लड प्रेशर, नेत्र तपासणी करून आवश्यक त्या रूग्णांना मोफत औषधोपचार देखील करण्यात आले. तसेच आशासेविकांच्या मदतीने परिसरातील नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड वाटप व नोंदणी करण्यात आली.
भाजपा शहर सरचिटणीस अमित घुगे, भाजपा पंचवटी मंडल अध्यक्ष राहुल कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर काकड यांच्या उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री गुरूजी रूग्णालयाच्या वतीने डॅा. अभय शुक्ल, डॅा.शर्मिला कुलकर्णी, डॅा.पुष्पेंद्र गांगुर्डे आदींसह नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ उपस्थित होते.
या महाआरोग्य शिबीराचे आयोजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा प्रदेश सचिव डॅा.ऋषिकेश जयंत आहेर व नाशिक जिल्हा कॅालेज टिचर्स पतसंस्था चेअरमन प्रा.सौ.वैशाली आहेर (कोकाटे) यांच्या वतीने करण्यात आले.
Comments are closed.