नाशिक/एनजीएन नेटवर्क
मूळ आराई (ता. बागलाण) येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, तसेच माजी खा. राजू शेट्टी यांचे खाजगी सचिव जगदीश शांताराम इनामदार याचे गुरुवारी नाशिक येथे उपचारादरम्यान निधन झाले.
दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्या दुःखातून सावरत असतानाच त्यांचीही मागील महिन्यात अचानक तब्येत बिघडली. त्यांना उपचारासाठी मुंबई येथे नेले होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर नाशिक येथील ग्लोबल इस्पितळात उपचार सुरू होते. फुफ्फुसाचा आजार वाढल्याने अखेर गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. जगदीश इनामदार हे माजी खा. राजू शेट्टी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. सध्या ते विदर्भातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांचे खाजगी सचिव म्हणून काम पहात होते, त्यांच्या पश्च्यात एक भाऊ, बहीणी, आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. इनामदार यांच्या पार्थिवावर अमरधाम पंचवटी नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.