मुंबई/एनजीएन नेटवर्क
मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात आज गुरुवारी वाढ झाली. आजच्या तेजीमुळे बाजार भांडवल 319.10 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. आधीच्या व्यवहाराच्या दिवशी बाजार भांडवल बुधवार, 6 सप्टेंबर रोजी 317.33 लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ आजच्या दिवशी कंपन्यांच्या बाजार भांडवलात सुमारे 1.77 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
आज दिवसभरातील व्यवहारात बँक निफ्टीत तेजी दिसून आली. बँक निफ्टीत 469 अंकांची तेजी दिसून आली. बँक निफ्टी निर्देशांक 55,878 अंकांवर स्थिरावला. त्याशिवाय, ऑटो, आयटी, मीडिया, एनर्जी, ग्राहकोपयोगी वस्तू,ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमधील शेअर्स तेजीसह बंद झाले. हेल्थकेअर, एफएमसीजी, फार्मा सेक्टरमधील स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये आजही तेजी दिसून आली.