NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

काका पुतण्याला घेरणार ? निवडणूक आयोगाला शरद पवार गटाचे उत्तर..

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला आहे. त्यांच्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला नोटीस पाठवली होती. त्या नोटीसला आता शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आले आहे. या उत्तरात शरद पवार यांच्या गटाकडून अजित पवार यांच्या गटाला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही, असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिन्हाबाबतची मागणी ही तथ्यहीन, दुर्भाग्यहीन आहे, असे शरद पवार गटाने म्हटले आहे. अजित पवार गटाची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली पाहिजे, अशी मागणीही शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने जे आम्हाला पत्र पाठवलं आहे, त्या अनुषंगाने आम्ही उत्तर दिले आहे. उत्तर देत असताना आम्ही स्पष्टपणे सांगतिले आहे की, अशी काही फूट पडलेलीच नाही. पक्षच आमचा आहे. या पक्षावर दुसरा कुणी दावा करु शकत नसल्याचे आव्हाड म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.