मुंबई : महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका यांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. प्रभाग रचनांसंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून देखील जोरदार तयारी सुरु आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप वगळता कुणाशीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची युती कुणाशीही होऊ शकते, अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोडून कुणाशी देखील युतीसाठी तयार आहे, अशी माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे. यामुळं युतीसाठी अजित पवार यांच्या पक्षाचा ही पर्याय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी खुला राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवले जाणार आहेत, अशी माहिती देखील सूत्रांकडून देण्यात आली आहे.