मुंबई/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजित पवार यांच्या गटाकडून वापरण्यात येत असलेल्या शरद पवारांच्या फोटोवर आता खुद्द शरद पवारांनीच आक्षेप घेतला आहे. तसेच आपला फोटो वापरू नये, असा सज्जड इशाराही शरद पवारांनी दिला आहे. अजित पवारांच्या गटाकडून वापरण्यात येणाऱ्या पोस्टरवर शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
‘माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहे. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, त्या पक्षाने माझा फोटो वापरवा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये, असे शरद पवार म्हणाले आहेत.