सातारा/एनजीएन नेटवर्क
अजित पवार आमचे नेते आहेत असे वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अवघ्या चार तासांत शरद पवार यांनी घुमजाव केले आहे. पवारांच्या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. अजित पवार आमचे नेते आहेत ही असे मी बोललो नाही, ही माध्यमांची चूक असल्याचे आता शरद पवार यांनी म्हटले आहे. संधी सारखी मागायची नसते, संधी सारखी द्यायची नसते असे स्पष्ट करत शरद पवारांनी अजित पवारांना आता संधी नाही हे जाहीर केले आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर आमच्या सहकाऱ्याला एक संधी दिली. मात्र संधी सारखी दिली जात नाही असे पवार म्हणाले.
एकीकडे पवारांच्या विधानाने संभ्रम निर्माण झाला असताना, पवारांनी केंद्र सरकारवर कडाडून हल्लाबोल केला. शेतकरी हिताआड येणाऱ्यांना कधीही पाठिंबा नाही असे पवार म्हणाले. सत्तेचा वापर हा पक्षात फूट पाडण्यासाठी केला जातोय असे पवार म्हणाले. दरम्यान शरद पवार यांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास अजित पवार यांनी नकार दिला आहे. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही असं सुप्रिया सुळे यांनी काल म्हटलं होतं. त्यावर शरद पवारांना आज बारामतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार हे आमचे नेते आहेतच, मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून पक्षात फूट पडली असे नाही असे पवारांनी म्हटले आहे.