NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

पाच मुलींचे लैंगिक शोषण; वसतिगृह केअरटेकरचा संतापजनक प्रताप

0

 जळगाव/एनजीएन नेटवर्क

वसतीगृहात वास्तव्यास असलेल्या पाच मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा संतापजनक प्रकार एरंडोल तालुक्यातील खडकी गावात उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, वसतीगृहाच्या केअरटेकरनेच मुलींवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तिघांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, एरंडोलमधील खडकी या गावात मुलींचे शासकीय वसतीगृह असून येथे वास्तव्यास असणार्‍या पाच बालिकांवर अत्याचार करण्यात आला. अल्पवयीन मुलींवर अनैसर्गिक अत्याचार देखील करण्यात आल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे वसतीगृहाचा केअरटेकर म्हणून काम करणार्‍या.  गणेश शिवाजी पंडित या इसमानेच हे घृणास्पद कृत्य केले असून त्याला वसतिगृह अधीक्षका तथा गणेशची पत्नी अरूणा गणेश पंडित आणि संस्थेचा सचिव भिवाजी दीपचंद पाटील सहकार्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांच्या विरोधेत एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

अनैसर्गिक कृत्य केल्याचाही आरोप

गेल्या जून महिन्यात वस्तीगृह बंद पडल्यानंतर या वस्तीगृहात असलेल्या पाच मुलींना जळगावातील शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे. या मुली तिथे गेल्यानंतर त्यांची सर्वांसोबत मैत्री झाली. त्यानंतर या मुलींनी वस्तीगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे खडके येथील वस्तीगृहात असताना आपल्यासोबत तेथील केअर टेकरने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.  गणेश शिवाजी पंडित वसतीगृहाचा केअरटेकर म्हणून तो कार्यरत असून त्याने वसतीगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे शोषण केले. ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ म्हणजे तब्बल दहा महिन्यांपर्यंत त्याने अनेकदा पीडित मुलींचे लौंगिक शोषण केले. यात त्याने अनैसर्गिक कृत्य देखील केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.