पुणे/एनजीएन नेटवर्क
सप्टेंबर महिन्यात मात्र पाऊस मोठा दिलासा देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. किंबहुना सप्टेंबरची सुरुवातच पावसाने होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चार दिवसांमध्ये राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होणार असून, 3 आणि 4 सप्टेंबरला तो अधिक जोर धरताना दिसेल. मराठवाडा, कोकण आणि विदर्भात या दिवसांदरम्यान समाधानकारक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने तूर्तास ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.