धाराशिव/एनजीएन नेटवर्क
दर्शनासाठी आलेल्या महिलेस खोलीमध्ये बोलावून घेत विनयभंग करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांना पोलिसांनी पंढरपुरातून येरमाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रुचून लोमटे महाराजाला पंढरपूरमधून अटक केली आहे.
एकनाथ लोमटे महाराजाविरोधात 28 जुलै 2022 रोजी पीडित भक्त महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लोमटे महाराजांविरोधात येरमाळा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिला मलकापूर संस्थांनचे सर्वेसर्वा तसेच भाविकांच्या सर्व समस्येवर उपाय करणारे स्वयंघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज यांच्या दर्शनासाठी परळी येथील 35 वर्षीय महिला मठातील दक्षिण मंडपात गेली होती.
महाराजांनी महिलेस प्रवचन खोलीमध्ये बोलून घेत महिलेचा विनयभंग केला होता. या घटनेने मंदिर परिसरामध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता यावेळी महाराजांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्याच रात्री एक वाजता सुमारात महिलेच्या तक्रारीवरून महाराजांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अटक ही झाली होती. मात्र त्यांची जामीनवर सुटका झाली. पीडित भाविक महिला अत्याचार प्रकरणी न्यायालयामध्ये दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशाने एकनाथ महाराज झाला पीडित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांना अटक करण्यात आदेश दिले होते. त्यानुसार लोमटे महाराजाला अटक केली आहे.