नाशिक/एनजीएन नेटवर्क
महाराष्ट्रातील ख्यातकीर्त गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांचे मध्यरात्री पावणेदोन वाजता निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्च्यात मुले शैलेश आणि कल्पेश आणि तर कन्या डॉ. दीप्ती देशपांडे असा परिवार आहे. रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. मो. स. गोसावी यांच्या जाण्याने शैक्षणिक क्षेत्रातील महर्षी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
जगातील सर्वात कमी वयाचा महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून त्यांची आजही नोंद कायम आहे. सरांचा श्रीमद्भगवद्गीतावर नितांत श्रद्धा व प्रचंड असा अभ्यास होता. शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. शहरी भागातील विद्यार्थ्यां बरोबरच ग्रामीण व दुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांनी गोखले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. ब त्यांच्या साठी शिक्षणाची कवाडे खुली केली होती. सामाजिक विकासासाठी शिक्षण हे एकमेव साधन आहे, हा विश्वास ठेवून त्यांनी स्वतःला शिक्षणाच्या प्रचार – प्रसारासाठी आजीवन वाहून घेतले होते. डॉ. मो. स. गोसावी यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
सरांच्या प्राचार्य पदाचा प्रारंभ ज्या बी. वाय. के महाविद्यालयातून झाला तिथे त्यांचे पार्थिव शरीर सकाळी १० ते ५ ह्या वेळेपर्यंत अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ, दिनकर पाटील , समीर भुजबळ , वसंत गिते सुनील बागुल आदींनी उपस्थिती दर्शवली. त्यांच्या अनेक प्रथितयश विद्यार्थ्यांपैकी प्रशांत खंबासवाडकर , प्रशांत अमीन तसेच नाशिक शहरातील अनेक मान्यवरांनी व संस्थेचे देणगीदार क्षत्रिय परिवार कपाडिया परिवाराचे सदस्य ह्यावेळी उपस्थित होते. संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.