नवीन नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
प्रभाग क्र. ३१ मधील शरयु पार्क येथे असलेल्या नर्मदेश्वर महादेव मंदिर परिसरात संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार सीमा महेश हिरे यांच्या हस्ते भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.
या कामासाठी आ. सीमा हिरे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून तब्बल ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे मंदिर परिसराच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. स्थानिक नागरिकांनी आमदार सौ. सीमा हिरे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भक्तांनी नर्मदेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर “आमचा देवा भाऊ” या अनोख्या आणि हृदयस्पर्शी संकल्पनेअंतर्गत महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना उद्देशून लिहिलेली भावनिक पत्रे विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला. या पत्रांचे संकलन आ.सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक आगळावेगळा उपक्रम ठरला आहे, जो भावनिक नात्याची साक्ष देतो. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि महिला मंडळींचे विशेष योगदान लाभले. हा उपक्रम केवळ विकासकामापुरता मर्यादित न राहता, श्रद्धा, संस्कृती आणि एकात्मतेचा संगम ठरल्याचे प्रतिपादन अनेकांनी यावेळी केले.
या सोहळ्याला नगरसेवक सतीश सोनवणे, श्याम बडोदे, भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड,महेश हिरे, जितेंद्र चोरडिया, त्रिंबक कोंबडे, विकास एखंडे, बालकृष्ण शिरसाठ, एकनाथ नवले, राम बोडोदे, सोनाली नवले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.