सांगली/एनजीएन नेटवर्क
बंदिस्त कम्पार्टमेंट तयार करुन शाळा-महाविद्यालयातील मुला-मुलींना एकांत मिळण्यासाठी प्रवेश देणाऱ्या इस्लामपूर शहरातील सात कॉफी शॉप्सवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सदर ठिकाणी अश्लील चाळे सुरु असल्याची तक्रार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
रापत माहितीनुसार, संबंधित कॉफी शॉप मालकांनी या शॉपमध्ये बंदिस्त कम्पार्टमेंट तयार करुन त्यामध्ये शाळा कॉलेजच्या मुला-मुलींना प्रवेश दिला जात होता. शॉपमधील हे कम्पार्टमेंट हे तासावर भाड्याने दिले जात होते. त्यामुळे मुले-मुली कॉफी शॉपमध्ये येतात आणि याठिकाणी असभ्य वर्तन केले जात असल्याची तक्रार पोलिसांनी आली होती. त्यानुसार परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकासह पोलीस पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये जवळपास 18 मुले-मुली असभ्य वर्तन करत असताना आढळून आले. या सर्वांचे समुपदेशन करुन तसेच ताकीद देऊन सोडून देण्यात आले. जे कॉफी शॉप मालक अल्पवयीन मुला मुलींना प्रवेश देतील आणि अशी मुले मुली असभ्य वर्तन करताना आढळून आले तर अशा शॉप मालकांवरही कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.