NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

इर्शाळवाडी शोध मोहिमेला पूर्णविराम; बेपत्ता लोकांबाबत ‘हा’ निर्णय

0

रायगड/एनजीएन नेटवर्क

 इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सलग तिसऱ्या दिवशी बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून सुरू असलेली शोधमोहिम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती घेतली. प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर शोधमोहिम थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. शोधकार्यात पावसामुळे येत असलेल्या अनेक अडचणी आणि इतर कारणांमुळे ही शोध मोहिम थांबवली जाणार आहे असं उदय सामंत यांनी सांगितले.

इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. तर २९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आता शोधमोहिम थांबवण्यात आली आहे. याची माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. दुर्घटनेत 57 जण बेपत्ता होते. त्यांना मृत घोषित करून आजपासून एनडीआरएफचे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. दरम्यान, बचावलेल्या 144 लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.