नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रामलल्लाची मुर्ती गर्भगृहात बसवली जाईल. अयोध्येत सुरू असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी असतील. त्यांचे हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे.
प्राणप्रतिष्ठेच्या एक आठवडा आधी पूजा सुरू होईल. राम मंदिराचा तळमजला पूर्णपणे तयार झाला आहे. त्याचबरोबर गर्भगृहाची निर्मितीही झाली आहे. लाइव्ह हिंदुस्थाने दिलेल्या वृत्तानुसार, 21 ते 23 जानेवारी दरम्यान एक शुभ ‘मुहूर्त’ निश्चित केला जाईल आणि पंतप्रधान मोदींना त्याची माहिती दिली जाईल. मंदिर प्रशासनाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. राम मंदिराचा तळमजला पूर्णपणे तयार झाला आहे. त्याचबरोबर गर्भगृहाची निर्मिती झाली आहे. अयोध्येतून निर्माणाधीन राम मंदिराचे अनेक फोटो समोर आले आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय अनेकदा बांधकामाशी संबंधित अपडेट्स आणि फोटो शेअर करत असतात.