- सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण प्रकल्प व प्रतिकृती सदर
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : राष्ट्रीय विज्ञान दिनाचे ( दि. २८ ) औचित्य साधून संस्थेचे संस्थापक डॉक्टर अगस्टीन पिंटो सर,संस्थापिका ग्रेस पिंटो मॅडम यांच्या मार्गदर्शना द्वारे सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर येथे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनी इयत्ता सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा उपयोग करून स्मार्ट ॲग्रीकल्चर, होलोग्राम, वॉटर प्युरिफायर, रोबोटिक आर्म, ट्राफिक कंट्रोल सिग्नल, चॉकलेट एटीएम, सोलर सिस्टम, सोलर कार इत्यादी नाविन्यपूर्ण प्रकल्प व प्रतिकृती या विज्ञान प्रदर्शनीत सादर करण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनी तील प्रत्येक प्रकल्पा साठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील विज्ञान शिक्षकांचे ंचे तसेच आपल्या पालकांचे मार्गदर्शन घेतले होते व त्यातून आपल्या कल्पनेचा अविष्कार घडवून आणून नाविन्यपूर्ण कलाकृतींची निर्मिती केली.
या विज्ञान प्रदर्शनाला सर्व विद्यार्थ्यांनी भेट दिली.
विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील मिस, विभाग प्रमुख भाग्यश्री मराठे इतर विज्ञान विषयाच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
Comments are closed.