NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

इंदोरीकर महाराजांना ‘सुप्रीम’ दणका..’त्या’ विधानावरून खटला चालणार

0

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क

लिंगनिदान दाव्यासंबंधी अशास्त्रीय तसेच बेकायदेशीर वक्तव्य करणारे कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इंदोरीकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला होता. खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत इंदोरीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, खंडपीठाचे निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने इंदोरीकर यांना मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे आता इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने इंदोरीकर महाराजांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे कलम 22 पीसीपीएनडीटी कायद्यानुसार इंदोरीकर महाराजांवर खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सम तारखेला आणि विषम तारखेला संबंध ठेवले तर मुलगा वा मुलगी होते असे विधान इंदोरीकर यांनी केले होते. त्यानंतर इंदोरीकर यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. संगमनेर प्रथम वर्ग कोर्टाने त्यांच्याविरोधात खटला चालवायचे आदेश दिले होते. याविरोधात इंदोरीकर जिल्हा कोर्टात गेले होते आणि जिल्हा कोर्टाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल रद्द केला होता. त्यानंतर याबाबत हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानेसुद्धा इंदोरीकर यांच्याविरोधात खटला चालवावा असा निकाल दिला होता. याविरोधात पुन्हा इंदोरीकर सुप्रीम कोर्टात गेले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा औरंगाबाद हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळं आता इंदोरीकर यांच्यावर खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

——————————-

@कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकरांवर गुन्हा दाखल होता. मात्र त्याच्या स्थगिती साठी त्यांचे प्रयत्न चालु होते. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरूद्ध खटला चालणार, यावर शिक्कामोर्तब केलं आहे.  ‘अंनिस’चा देवधर्माला विरोध नाही पण त्याच्यामागे चालणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध आहे. अंनिसकडून अविनाश पाटील व ॲड रंजना गवांदे यांनी हा लढा लढला आहे.

कृष्णा चांदगुडे

राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस

Leave A Reply

Your email address will not be published.