नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मराठवाडा साहित्य परिषद, संभाजीनगर यांच्या वतीने ग्रंथपाल कै. संध्या देशमुख मुळे यांच्या नावाने २०२४ पासून दिला जाणारा आदर्श ग्रंथालय पुरस्कार यंदाच्या वर्षी सार्वजनिक वाचनालय, नाशिकला प्रदान करण्यात आला.
मराठवाडा साहित्य परिषदचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते ७५०० रुपयाचा धनादेश, स्मृतिचिन्ह,शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार सावानाचे सांस्कृतिक कार्य सचिव जयप्रकाश जातेगावकर, ग्रंथसचिव देवदत्त जोशी, नाट्यगृह सचिव जयेश बर्वे, मंगेश मालपाठक वाचनालयाच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.या पुरस्काराने सावानाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल वाचनाच्या सर्व पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ, सभासद यांनी अभिनंदन केले.
Comments are closed.