NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

अरेरे ! अज्ञात वाहनाच्या धडकेने सावरगावच्या जवानाचा जागीच मृत्यू

0

लासलगाव/राकेश बोरा

भारतीय सैन्य दलातील जवान सागर नवनाथ पानमळे याच्या बुलेटला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने डोक्याला गंभीर इजा झाल्याने जागीच ठार झाला.

    याबाबत लासलगाव पोलीसांच्या माहितीनुसार भारतीय सैन्य दलातील जवान सागर नवनाथ पानमाळे  (वय-30, युनिट-69,आर्मड फिरोजपुर पंजाब)  (रा.सावरगाव ता.येवला) हा आपल्या बुलेटने लासलगावहून येवल्याकडे जात होता. आंबेगाव वेळापूर शिवारात रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने डोक्याला गंभीर इजा झाल्याने सागर पानमाळे जागीच ठार झाले तर सोबत असलेले पंकज चांगदेव पवार (वय-30 रा.सावरगाव) यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांना तत्काळ आधी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात तर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. धडक दिल्यानंतर वाहनाचा चालक फरार झाला आहे. यासंदर्भात लासलगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहे.

————————————

@ येवला तालुक्यातील सावरगावचे सुपुत्र भारतीय लष्करातील वीर जवान सागर पानमळे यांना वीरगती प्राप्त झाली. सावरगाव सारख्या छोट्याश्या गावातून पुढे येऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केले. देशसेवेची आवड असल्याने त्यासाठी कठोर मेहनत घेऊन ते भारतीय सैन्यदलात रुजू झाले. भारतीय सैन्यदलात त्यांनी अतिशय उत्तम अशी सेवा बजावली. नुकतेच त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतमातेने वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय पानमळे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.

  • छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
Leave A Reply

Your email address will not be published.