NGN News
Latest Marathi News

भूषण लोंढेला नेपाळ बॉर्डरवर बेड्या; दोन महिन्यांपासून होता फरार

सातपूर गोळीबार प्रकरण; पलायनाचा प्रयत्न केल्याने दोन्ही पाय फ्रॅक्चर

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

सातपूरमधील ओरा बार गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या भूषण प्रकाश लोंढे याला अखेर अटक करण्यात आली आहे. नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेजवळ भूषण लोंढेला ताब्यात घेतले. गेले दोन महिन्यांपासून भूषण फरार होता. दरम्यान, अटकेदरम्यान पोलिसांचा सुगावा लागलेल्या भूषणने उंचावरून उडी मारत पलायनाचा प्रयत्न केल्याने त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांनी त्याला ताब्यात आहे. याप्रकरणात अटकेत असलेला रिपाइंचा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा भूषण हा मुलगा आहे. त्याला लवकरच नाशिकमध्ये आणून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

भूषण लोंढे याच्यावर नाशिकमधील विविध पोलीस ठाण्यांत त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर हाणामारी, मालमत्ता हडपणे आदी अनेक गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. ओरा बार गोळीबार प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे. संघटीत गुन्हेगारी आडून दहशत फैलावून लोंढे पिता-पुत्रांनी अनेकांना धमकावण्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. सातपूर परिसरात लोंढे यांच्या बेकायदेशीररित्या उभारलेल्या कार्यालयातून सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांमुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तपासादरम्यान पोलिसांनी या कार्यालयावर टाकलेल्या धाडीत एक भुयारी मार्गही आढळून आला होता. 

Comments are closed.