NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

अविश्वास प्रस्तावामुळे सरपंचपदाचा उमेदवार अपात्र ठरत नाहीत.. न्यायालय

0

नागपूर/एनजीएन नेटवर्क

अविश्वास प्रस्तावामुळे सरपंचपदाचे उमेदवार अपात्र ठरत नाहीत. पदावरून हटलेल्या उमेदवारांना पुन्हा निवडणूक लढवता येऊ शकते असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने  दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमरावतीतील काथोरा ग्रामपंचायतीतील हे संपूर्ण प्रकरण आहे. या ग्रामपंचायतमध्ये १ जानेवारी २०२१ मध्ये सुजाता गायकी या अनुसूचित जाती या प्रवर्गातून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर ग्रामपंचायत बॉडीकडून अविश्वास घेण्यात आला आणि त्यांना पदावरून हटवण्यात आलं.

ग्रामपंचायतची पुन्हा निवडणूक लागली त्यावेळी गायकी यांनी परत सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. मात्र त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यामुळे त्यांना निवडणूक लढता येणार नाही असा निर्णय स्थानिक अधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर सुजाता गायकी यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली.

नागपूर खंडपीठाने या विषयावर अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे. जरी ग्रामपंचायतीने त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव संमत केला असला तरी त्या व्यक्तीला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय खंडपीठाने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.