NGN News
Latest Marathi News

ग्रामपंचायत मल्हारवाडी येथे सरपंच अश्विनी खैरनार यांच्या हस्ते ध्वजारोहण

नांदगाव : सचिन बैरागी

मल्हारवाडी ग्रामपंचायत येथे सरपंच सौ.अश्विनी मुकुंदा खैरनार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलदारवस्ती येथील ध्वजारोहण मल्हारवाडी गावचे उपसरपंच श्री.दिपक तात्याराव खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना दप्तर,वह्या, तसेच इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलदार वस्ती येथे संगणक संच देण्यात आला आणि अंगणवाडीतील मुलांना शालेय पाट्या वाटप करण्यात आल्या.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ. मीना भागीनाथ गोविंद, सौ.शोभा भाऊसाहेब पीठे, सौ.सरला वाल्मिक काकळीज, श्रीमती.चित्रा मधुकर इघे, सौ.सारिका संदीप जेजुरकर, सौ.सुनंदा बळीराम झेंडे, श्री. राहुल बाळू पवार आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे श्री.राजाभाऊ जगताप, श्री.वाल्मिक काकळीज, श्री.भागीनाथ गोविंद, श्री.वाल्मिक खैरनार, श्री.भाऊसाहेब पिठे, श्री. योगेश गेजगे, तसेच बचत गट महिला सौ. रुपाली जगताप. सौ.रोहिणी आहेर, सौ.अरुणा गोरे, सौ. गौरी रोहम, सौ.मनिषा भवर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.