NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

सराफ दाम्पत्याचे दातृत्व.. २० ज्येष्ठ कलाकारांना प्रत्येकी ७५ हजारांची मदत !

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ या जोडप्याने नुकताच ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ नावाचा नवा उपक्रम सुरु केला आहे. याअंतर्गत ज्येष्ठ रंगकर्मी, ज्येष्ठ कलाकार, बॅकस्टेजवर काम करणारे तंत्रज्ञ, वयामुळे ज्यांना काम करणे शक्य होत नाही. अशा गरजू लोकांना मदत करण्यात येणार आहे.

कृतज्ञ मी कृतार्थ मी’ या उपक्रमाचे गेल्या शनिवारी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पडद्यामागील २० ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यात आला. अशोक आणि निवेदिता सराफ यांनी या कलाकारांना प्रत्येकी ७५ हजारांची मदत केली. नव्या उपक्रमात भाऊ सुभाष सराफ याची साथ मिळाली आणि अमेरिकेत राहणारे संजय पैठणकर यांनी १० लाखांची मदत केल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले.

यांचा’ झाला सन्मान ..

विद्या पटवर्धन, उपेंद्र दाते, बाबा पार्सेकर, अर्चना नाईक, वसंत अवसरीकर, दीप्ती भोगले, सुरेंद्र दातार, विष्णू जाधव, रवींद्र नाटळकर, नंदलाल रेळे, अरुण होर्णेकर, प्रकाश बुद्धिसागर, पुष्पा पागधरे, उल्हास सुर्वे, एकनाथ तळगावकर, सीताराम कुंभार, हरीश करदेकर, शिवाजी नेहरकर, किरण पोत्रेकर, वसंत इंगळे या २० ज्येष्ठ रंगकर्मींचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

——————————–

@ मला ज्या लोकांनी मदत केली त्यांना मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. माझ्या कुटुंबाकडून या २० ज्येष्ठ कलाकारांना दिलेली ही लहानशी भेट आहे. यामुळे त्यांना मदत झाली तर मला आनंदच आहे. निवेदिताची ही सगळी कल्पना आहे. मी सुरुवातीला एवढ्या गोष्टी जुळून येतील की नाही? म्हणून घाबरलो होतो परंतु, सगळे लोक आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले.

  • अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते
Leave A Reply

Your email address will not be published.