मालेगाव/राजेश सूर्यवंशी
भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यात मिशन मोदी @९ अंतर्गत विविध कार्यक्रम व प्रकल्प राबविले जात आहे व गेल्या नऊ वर्षात राबविलेल्या विविध लोकोपयोगी विकास कामे जनतेपर्यन्त पोहचविण्याच काम भाजपच्या सर्व विभागांमार्फत केले जात आहे. त्याच अनुषंगाने मालेगाव येथील जिल्हा कार्यालयात भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या आदेशानुसार गेल्या गुरुवारी महिला प्रदेश पदाधिकारी परिचय संवाद बैठक व भरड धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महिला मोर्च्याच्या पदाधिकारी भरड धान्य( मिलेट ) महोत्सव आयोजन प्रमुख रोहिणीताई नायडू, प्रदेश महामंत्री छायाताई देवांग, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ सुरेखा भुसे, प्रदेश उपाध्यक्ष स्वातीताई भामरे, सरचिटणीस सौ माधुरी पालवे,उपाध्यक्ष सौ जयश्री अहिरराव, मालेगाव शहर प्रमुख नीता पठाडे यांनी महिला सदस्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मिशन मोदी @ ९ अंतर्गत मार्गदर्शन करताना सर्व महिला पदाधिकारी यांनी सांगितले की, मा पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात राबविलेल्या विविध लोकोपयोगी विकास कामे ही आगामी काळात जनते पर्यंत पोहचविण्याचे काम प्रत्येक महिला पदाधिकारी व सदस्या यांना करायचे आहे. तसेच विविध शासनाच्या योजना ह्या लाभार्थ्यांन पर्यंत सम्पर्क साधून पोहचविण्याच्या आहेत.नवमतदार नोंदणी,मिलेट म्हणजे भरड धान्य महोत्सव यात भरड धान्यापासून विविध प्रकारचे पदार्थ तयार कसे करावेत यावरही महिलाशी हितगुज साधण्यात आले. यामुळे उत्तम आहार हाच मानवी जीवनाचा महत्वाचा घटक आहे. धकाधकीच्या जीवनात आपण विसरतो आहोत म्हणून चालू वर्ष हे भाजपा पक्षाकडून भरड धान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.अश्या प्रकारचे एक ना अनेक उपक्रम राबवायचे आहेत त्यासाठी आपण लोकांपर्यंत उपक्रम पोहचविण्याचा प्रयत्न करावा,असे महिला सदस्य व कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आलेत. यावेळी प्रदेश पदाधिकारी व स्थानिक पदाधिकारी यांनी एकमेकांचा परिचय करून देत सवांद साधला.
कार्यक्रमास भाजपा महिला सदस्य नलिनीताई पाटील,मनीषा खैरनार, यामिनी पवार यांच्यासह महिला पदाधिकारी, सदस्या व कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या. बैठकीचे आयोजन मालेगाव महिला मोर्च्याच्या जिल्हाध्यक्ष सौ सुरेखा भुसे पाटील यांनी केले होते. बैठकीस उपस्थित सर्व मान्यवरांचे,सर्व महिला पदाधिकारी व सदस्यांचे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.