NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

संजीव जयस्वाल १०० कोटी मालमत्तेचे मालक; जयस्वाल म्हणाले..

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी १५ ठिकाणी छापे टाकून १५० कोटी रुपयांच्या ५० मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली. त्यातील ४ ते ५ मालमत्ता आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सूरज चव्हाण यांच्या, तर सुमारे १०० कोटींच्या मालमत्तांची कागदपत्रे सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांची असल्याचे सूत्रांनी सांगितले.

करोना काळात मुंबई महानगरपालिकेने दिलेली कंत्राटे चार ते पाच मध्यस्थांच्या माध्यमातून देण्यात आली. त्यात युवासेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्यासह फर्निचरवाला बंधु आदींचा समावेश आहे. चव्हाण यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात ‘ईडी’ला उपनगरात खरेदी करण्यात आलेल्या चार ते पाच सदनिकांची माहिती मिळाली आहे. त्यांची किंमत १० ते १२ कोटी रुपये असल्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कंत्राटांबाबत तसेच मालमत्ता व इतर व्यवहारांबाबत चौकशीसाठी चव्हाण यांना सोमवारी ‘ईडी’ कार्यालयात बोलवण्यात आले आहे. जयस्वाल यांच्या मढ आयलंडच्या मालमत्तेव्यतिरिक्त ‘ईडी’ने मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील इतर दोन ठिकाणीही छापे टाकले. त्या मालमत्ता महानगरपालिकेतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि एका संशयित पुरवठादाराच्या होत्या. दरम्यान, या मालमत्ता वडिलोपार्जित असल्याचे जयस्वाल यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच आपल्याला याप्रकरणी चुकीच्या पद्धतीने अडवकण्यात येत असल्याचेही जयस्वाल यांचे म्हणणे आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.