मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या गुन्हेगारांशी मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधला जातोय, असा खळबळजनक आरोप करणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्या अंगलट येणार असल्याचे दिसते. कारण याच आरोपांवरून राऊत यांना मुंबई क्राईम ब्रँचकडून नोटीस देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातून अंडरवर्ल्डची टोळी चालवली जाते असा दावा खा. राऊत यांनी केला होता. मुख्यमंत्री कार्यालयातून कारागृहातल्या अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जातोय असा आरोप राऊतांनी केला होता. गृहमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयावर लक्ष द्यावे, असा सल्ला राऊतांनी दिला. तर राऊतांचे आरोप बेछुट आणि खोटे असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला होता. आता क्राईम ब्रांचने नोटीस पाठवून या आरोपासंदर्भातील पुरावे आणि माहिती मागवली आहे. यामुळे संजय राऊत यांचा जबाब देखील नोंदवला जाऊ शकतो.