NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

वाळूमाफियांचा हैदोस ! परिविक्षाधिन तहसीलदारांच्या अंगावर जेसीबी नेऊन..

0

जळगाव/एनजीएन नेटवर्क

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या पथकातील परिविक्षाधिन तहसीलदारांच्या अंगावर जेसीबी नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पातोंडी (ता. रावेर) येथे रविवारी रात्री घडली. या प्रकरणी दहा जणांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे तर सात जण फरार झाले. 

प्राप्त माहितीनुसार, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा बसण्यासाठी परिविक्षाधिन तहसीलदार मयूर कळसे यांच्या नेतृत्वाखाली पथक खिरवड, पातोंडी शिवारात गस्त घालीत असताना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पातोंडी पुनखेडा रस्त्यावरून भोकर नदीपात्रात जेसीबी व ट्रॅक्टर निदर्शनास आले. पथकाने मोहन बोरसे यास जेसीबी मशिन रावेर तहसील कार्यालयात घेण्यास सांगितले. मात्र, त्याने जेसीबी सुरू करून मयूर कळसे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने जोरात अंगावर आणले व जेसीबी घेऊन पळून गेला. तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक अनोळखी व्यक्ती ट्रॅक्टर घेऊन पळून गेला व मनोज दशरथ बोरसे याने विना क्रमांकाचे ट्रॅक्टर वाळूने भरलेले कारवाईसाठी तहसील कार्यालय रावेर येथे घेऊन येत असताना पातोंडी गावाजवळ ट्रॅक्टर जोरात घेऊन खिरवड गावाच्या दिशेने घेऊन गेला.

Leave A Reply

Your email address will not be published.