नागपुर/एनजीएन नेटवर्क
नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान या गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता होत्या. या प्रकरणात मध्य प्रदेशातून अमित साहू नामक आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलीय. अमित साहू यानं सना खान यांची हत्या केली असल्याची पोलिसांसमोर कबुली दिलीय. नागपूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर अमित साहूला अटक केली आणि अन्य दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सना खान या मध्य प्रदेशातील जबलपूरला गेल्या असताना त्यांचं अमोल साहू यांच्यासोबत जोरदार भांडण झालं.त्यानंतर अमितनं सनाच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली आणि मृतदेह हिरण नदीत फेकून दिला, अशी प्राथमिक माहिती अमित साहूने पोलिसांना दिली आहे. आपआपसातील भांडण आणि पैशांसंदर्भातलं भांडण हे हत्येचे कारण आहे. त्यानंतर झालेल्या भांडणात अमितनं सनाच्या डोक्यावर रॉड मारला आणि मग तिचा मृतदेह नदीच्या पाण्यात फेकून दिला. अमित साहू हा एक ढाबा चालक आहे. सनाने त्याच्यासोबत कोर्ट मॅरेज केले होते.