- हारगुच्छ नकोत, पुस्तके आणा; नाशिक कार्यालयात स्वीकारणार शुभेच्छा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणताही भव्य सोहळा न करता, लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक जाणिवेचा प्रत्यय देत माजी समीर भुजबळ यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी खासदार समीर भुजबळ हे गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर २०२५, बुधवार रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत ते भुजबळ फार्म, नाशिक येथे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
“राज्यातील अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना व नागरिकांना फटका बसला आहे. त्यामुळे यावर्षी वाढदिवसानिमित्त कोणताही मोठा कार्यक्रम किंवा स्वागत सोहळा आयोजित न करता, फक्त भेटीद्वारे सदिच्छा स्वीकारणार आहे. तसेच वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, शाल, हार किंवा भेटवस्तू न आणता, विविध विषयांवरील पुस्तके घेऊन यावीत. जेणेकरून जमा झालेली सर्व पुस्तके जिल्ह्यातील विविध वाचनालयांना देण्यात येतील. त्यातून वाचन संस्कृती वाढीस लागण्यास मदत होईल असे आवाहन कार्यालयाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.
Comments are closed.