NGN News
Latest Marathi News

नवरात्रोत्सवात समर्थ सेवेकरी करणार श्री दुर्गा सप्तशतीचे सव्वा कोटी पाठ

  • हजारो केंद्रांमध्ये सेवेला आले उधाण

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र दिंडोरी आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरसह गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे आणि समर्थ गुरुपीठाचे महा व्यवस्थापक चंद्रकांत दादा मोरे यांचे मार्गदर्शनाखाली देशातील हजारो श्री स्वामी समर्थ केंद्रांमध्ये नवरात्रीनिमित्त अध्यात्मिक सेवेला उधाण आले असून लाखो महिला पुरुष सेवेकरी मोठ्या उत्साहात या सेवेत सहभागी झाले आहेत. विशेषता आज महाराष्ट्र, देश आणि जगभर जी विचित्र परिस्थिती उद्भवली आहे,संपूर्ण मानव जात आज नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांनी ग्रासली आहे आणि हतबल झाली आहे.या परिस्थितीत माता भगवतीने या संपूर्ण मानव जातीला आधार द्यावा आणि मानव जातीचे जे अपरिमित नुकसान होणार आहे त्यापासून बचाव व्हावा म्हणून श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाची पारायणे करून माता भगवतीस साकडे घालण्याचे ठरविले आहे. नवरात्रीनिमित्त दहा दिवसात संपूर्ण देशातील लाखो महिला पुरुष सेवेकरी श्री दुर्गा सप्तशतीचे सव्वा कोटीपेक्षा अधिक पाठ करून संपूर्ण मानव जातीच्या संरक्षणासाठीच माता भगवतीस शरण जात आहेत.

जेव्हा जेव्हा भारत मातेवर विचित्र स्वरूपाची मानवनिर्मित नैसर्गिक संकटे चालून आलेत तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या महिला पुरुष सेवेकऱ्यानी एकत्रित येऊन सामुदायिक रित्या लाखोच्या संख्येने अध्यात्मिक सेवा रुजू करून या संकटातून भारत मातेची सुटका व्हावी म्हणून माता भगवती आणि आपले सर्वांचे पिता भगवान शंकर जी आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांना साकडे घालून या संकटातून सुटका होण्यासाठी विनंती केली आहे.

आज संपूर्ण महाराष्ट्रभर जी अतिवृष्टी होत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांचे कंबरडे मोडले आहे.ही परिस्थिती राज्यापुरतीच नाही तर देशभर आज अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे देशातील शेतकरी बांधव आज भयंकर संकटात आहेच परंतु यातून रोगराईही उद्भवणार आहे. हे आपल्या राज्यापुरते किंवा देशापुरते मर्यादित नसून आज जगभर अनेक देशांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण मानव जात मेटाकुटीस आलीच आहे परंतु त्यात अतिरेकी कारवाया,दहशतवाद,युद्ध,महायुद्ध, विविध आजारांच्या साथी अशी विविध स्वरूपाची संकटे उभी आहेत. यातूनच मार्ग निघण्यासाठी गुरुमाऊली ब्रम्हचा अण्णासाहेब मोरे यांनी या नवरात्रीनिमित्त सेवेकऱ्यांना अधिक सेवा करण्याचे आदेश दिले. संपूर्ण राज्य आणि देशभर सेवेकऱ्यांना गुरुपीठाचे महाव्यवस्थापक चंद्रकांत दादा मोरे मार्गदर्शन करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन ही अधिकाधिक सेवा कशी करायची याबाबत सूचना करीत आहेत.

जगभरातील सुमारे सात हजार श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांप्रमाणेच गावातील मंदिरे,शाळा व उपलब्ध सार्वजनिक ठिकाणी ही सेवा काही प्रमुख सेवेकरी करून घेत आहेत. याशिवाय हजारो महिला पुरुष सेवेकरी आपापल्या घरी श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करीत आहेत.

यानिमित्त चंद्रकांत दादा मोरे म्हणाले की गेली साठ वर्ष श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने वर्षभर आणि नवरात्री सारख्या उत्सवात श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाची पारायणें लाखो स्त्री,पुरुष हे करीतच असतात परंतु सध्या राज्य,देश आणि जगभर जी भयावह परिस्थिती उद्भवलेली आहे ती लक्षात घेता यावर्षी अधिकाधिक सेवा गुरुमाऊलींच्या आदेशाने करण्याचे सेवेकर्‍यांनी ठरविले आहे.

Comments are closed.