वार्षिक सर्व साधारण सभा : नवीन आर्थिक वर्षासाठी ‘उत्सव कर्ज योजना’ सुरु
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील श्री समर्थ सहकारी बँकेची ३१ वी वार्षिक सर्व साधारण सभा रविवार ( दि. ०७ ) आय. एम. ए. हॉल, नाशिक येथे चेअरमन श्रीपाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती. सभेमध्ये यावर्षी सभासदांना ८ टक्के लाभांश देणार असल्याचे चेअरमन कुलकर्णी यांनी जाहीर केले.
सभेच्या सुरुवातीस पदाधिकारी व संचालक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. बँकेचे चेअरमन श्री. श्रीपाद शंकर कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना उपस्थित सभासदांचे स्वागत केले. आर्थिक वर्ष २०२४ -२५ या कालावधीत बँकेची आर्थिक परिस्थिती मजबूत झालेली आहे व बँकेस ऑडिट वर्ग “अ” मिळालेला आहे. आर्थिक वर्षात एनपीए कर्जखात्यात रु.३ कोटी ९७ लाख ६२ हजार इतकी वसूली झाल्याने बँकेचा नेट एनपीए १.२७ % इतका आहे. बँकेस ढोबळ नफा रु. १ कोटी ५६ लाख ८९ हजार झालेला असून यावर्षी सभासदांना ८% लाभांश देणार असल्याचे अध्यक्ष श्री. श्रीपाद कुलकर्णी यांनी जाहीर केले. त्यावेळी सर्व सभासदांनी आनंद व्यक्त केला व संचालक मंडळाचे कामकाजा बद्दल समाधान व्यक्त केले.
नवीन आर्थिक वर्षासाठी “उत्सव कर्ज योजना” सुरु करण्यात आलेली आहे. त्यात वाहन कर्ज व कंज्यूमर डयूरेबल कर्जासाठी कर्ज प्रक्रिया शुल्क माफ केली असून , कर्जास जामीनदार नाही व त्वरित कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. बॅकेचे अंतर्गत मजबूतीकरण व आधुनिकीकरणावर भर देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. बँक F.S.W.M. चे नॉर्मसमध्ये येत असून त्याबाबत व ऑनलाइन बँकिंग सुरू करणेबाबत संचालक मंडळाचे प्रयत्न चालू असल्याचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी नमूद केले. यावेळी विशेष कामगिरी केलेल्या मान्यवर सभासदांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सीए प्रकाश गंगाधर पाठक, यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचेकडून “यश जीवन गौरव” पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच सभासद उल्हासजी दामोदर कुलकर्णी यांनी सायकल रेस मध्ये ब्राओ वर्ल्ड रेकॉर्ड ३८०० किमी. दृष्टीहीन सायकल स्वाराला घेऊन नऊ दिवसात टॅन्डम सायकलवर पूर्ण केले त्याबद्दल व उत्कृष्ठ कर्जदार म्हणून मा. श्री. हरपालसिंग बाजवा तसेच उत्कृष्ठ कासा ठेवीदार मे. सेंचुरी बिल्डकॉनचे अजय पोपटलाल हिरण, सचिन शंकर जाधव, उत्कृष्ठ ठेवीदार म्हणून राहुल रमेश भंडारी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजात बँकेचे मान्यवर सभासद व माजी संचालक श्री. मकरंद सुखात्मे, डॉ. श्री प्रशांत पुरंदरे, सौ. अलका कुलकर्णी, श्री. बाळकृष्ण कुलकर्णी, श्री. अरुण भांड, सौ. स्पृहा मुनशेट्टीवार, श्री. मंगेश मालपाठक व सहकारी
संस्था जिल्हा उपनिबंधक ऑफिसचे श्री. संजय गीते तसेच श्री. सुहास भणगे, श्री. सचिन निरंतर, श्री.प्रदीप जाधव, श्री. राहुल भंडारी, श्री. संदीप गोसावी,श्री. वसंत कुलकर्णी, श्री. उल्हास कुलकर्णी, सी.ए. श्री. प्रशांत कुलकर्णी, श्री. कैलास डोंगरे, श्री.मुक्तेश्वर मूनशेट्टीवार, डॉ. श्री.एकनाथ कुलकर्णी, श्री.प्रमोद पुराणिक तसेच विविध क्षेञातील बॅंकेच्या सन्माननीय मान्यवर सभासद यांनी सभेच्या कामकाजात भाग घेतला.
सभेस बँकेचे व्हा. चेअरमन श्री. राजेश गांगुर्डे, मा. संचालक ॲड. श्री. जालिंदर ताडगे, श्री. नरेंद्र कुलकर्णी, डॉ. श्री. रविकिरण निकम, श्री. राधाकृष्ण नाईकवाडे, श्री. मनोज गोडसे, श्री. शिरीष मोराणकर, श्री. राजेंद्र खेडलेकर, श्री. मनोज बाग, श्री. मंदार
तगारे, सौ. योगिता खांडेकर, किशोरी एकबोटे (सौ. दीप्ती पंडीत), सी. ए. रुपाली जुन्नरे, बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रकाश चितोडकर, सरव्यवस्थापक श्री. दीपक ठाकूर आदी उपस्थित होते. सभेचे सूत्र संचालन संचालक श्री. मंदार ओलतीकर व आभार प्रदर्शन श्री.पुष्कर पाराशरे यांनी केले. राष्ट्रगीत झाल्यावर सभा संपन्न झाल्याचे अध्यक्ष श्री. श्रीपाद कुलकर्णी यांनी जाहीर केले.अशा प्रकारे बँकेच्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले.
Comments are closed.