कालिकामातेची आरती करून समाजबांधवांकडून पेढेवाटप
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत नाशिक जिल्ह्यात सकल मराठा समाजाने जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. जिल्ह्यातील विविध भागांत या विजयाचा गुलाल उधळत मराठा समाज बांधवांनी आनंदोस्तव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला. नाशिक मधील समाज बांधवांनी ग्रामदैवत कालिकामातेची आरती करून समाजबांधवांनी पेढे वाटले आणि फटाक्यांच्या रोषणाईत सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता शैक्षणिक व नोकरीमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याकारणाने राज्य सरकारचे कौतुक करत मराठा समाजाने अभिनंदन याचा प्रस्ताव यावेळी ठेवत तो सर्वांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आला.
सकल मराठा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले.त्यावेळी हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर,नानासाहेब बच्छाव, विलास पांगरकर,केशव अण्णा पाटील, नितीन सुगंधी,राजू देसले,आशिष हिरे, प्रफुल वाघ,डॉ रुपेश नाठे,राम खुर्दळ, योगेश गांगुर्डे,प्रवीण पाटील,भारत पिंगळे,योगेश कापसे,राम पाटील,विकी गायधनी,नितीन काळे,राजेंद्र शेळके, नितिन खैरनार, अनिल आहेर, संदीप हांडगे, ममता शिंदे, रेखा जाधव, रागिनी आहेर, रोहिणी उखाडे, अमोल शिंदे, किरण पानकर,महेंद्र बेहरे,ज्ञानेश्वर कवडे,आदीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———-
@ राज्य शासनाने ज्या पद्धतीने सारथी शिक्षण संस्था कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यासाठी सातत्याने प्रयत्न करून त्या माध्यमातून अनेक मराठा समाजातील मुलांना नोकरीत व व्यवसायात पुढ आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले त्याच पद्धतीने आता मंजूर केलेल्या मागण्या सुद्धा कायमस्वरूपी टिकवून मराठा समाजाला न्याय देतील, अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. सरकारचे अभिनंदन करतो तसेच मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी सुद्धा सरकारने योग्य ते प्रयत्न करून न्याय द्यावा.
– करण गायकर – राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
Comments are closed.