नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज मंगळवार (०१ ऑगस्ट) रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, वरिष्ठ व्यवस्थापक प्रमोद फुलकर, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, उपव्यवस्थापक स्वप्नील गोराणे यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed.