नाशिक/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अंबादास खैरे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. यावेळी त्यांनी वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देत भावी उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा दिल्या.
यावेळी महिला शहराध्यक्ष योगिताताई आहेर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, संदिप गांगुर्डे, अनुप वझरे, अशोक पाटील, संदीप खैरे, सागर तांबे, रामदास शिंदे, रोहित जाधव, संतोष पुंड, स्वप्नील फुले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.