NGN News
Latest Marathi News

निफाडमधील रुई येथे कडाक्याची थंडी; ४.०७ तापमानाची नोंद

** राकेश बोरा

लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क

निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढत असून किमान तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या घसरला आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे संपूर्ण तालुका गारठून गेला असून नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील रुई येथे किमान तापमान 4.07 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 4.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

वाढत्या थंडीमुळे लासलगाव येथील शिवनदीवर बाष्पयुक्त धुक्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे. पाण्यावरून उठणाऱ्या बाष्पामुळे संपूर्ण परिसर नयनरम्य दिसत आहे. तर गारठून टाकणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेतला असून सकाळी आणि रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटवून उब मिळवली जात आहे. दरम्यान, या थंडीचा शेती पिकांवरही परिणाम होत आहे. ही थंडी द्राक्ष पिकांसाठी अपायकारक ठरत असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे मात्र, गहू आणि हरभरा यांसारख्या रब्बी पिकांसाठी ही थंडी पोषक ठरत आहे.

Comments are closed.