कळवण/एनजीएन नेटवर्क
सप्तश्रृंगी गडाच्या विकासासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ८१ कोटी ८६ लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास शासनस्तरावर मंजूरी देण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज कळवण येथे कळवण व सुरगाणा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
पवार म्हणाले, सप्तश्रृंगी गड देवस्थान हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी व पर्यटनाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या ८१ कोटी ८६ लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत मंजूरी देण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून योजनांची अमंजबजावणी शासनस्तरावर करण्यात येत आहे. विविध विकास कामांवरील असलेली स्थगितीही शिथिल झाली असून येणाऱ्या काळात प्रस्तावित विकासकामांनाही मंजूरी देण्यात येवून आर्थिक तरतूद केली जाईल.