NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

घोटीनजिक तीन लाख ३८ हजार रुपयांचा गुटखा पकडला; एकास अटक

0

घोटी/राहुल सुराणा

मुंबई – नाशिक महामार्गालगत घोटी शिवारात नागनाथ मंदिराजवळ तीन लाख ३८ हजार रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. घोटी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय खबरी द्वारे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून एका संशयितासह एक वाहन देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  प्राप्त माहितीनुसार, शहरातील सुनिलकुमार रामलोचन गुप्ता ( वय ३२ ) हा वेगनर ( एमएच : १५ डीसी,४६४८ ) या वाहनातून प्रतिबंधित असलेला गुटखा वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.  त्यांनी आपले पथक तातडीने घटनास्थळी सध्या वेषात ठेवत संशयितावर पाळत ठेवली होती.  दरम्यान साडे अकरा वाजेच्या दरम्यान संशयित हा नागनाथ मंदिरा जवळील एका दुकानात जात असताना त्याला पकडण्यात आले. सोबत असलेल्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला, गुटखा आदीच्या गोण्यामध्ये साठा सापडला. गुजरात मार्गे माल आणून तो ग्रामीण परिसरातील शहरी,दुकानदारांना होलसेल पद्धतीने विकत असल्याची कबुली संशयित गुप्त याने दिली.  त्याच्या वाहनात एकूण विविध प्रकारचा गुटखा हा एक लाख ३८ हजार रुपयांचा व वेगनार वाहन दोन लाख असा एकूण तीन लाख ३८ हजार ६७५ रुपयांचा मुद्देसूद माल हस्तगत करण्यात आला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक हवालदार रामकृष्ण लहामटे,गोपनीय निलेश साळवे,मारुती बोराडे, पंकज दराडे,विक्रम झालटे,गोविंद सदगीर यांनी कामगिरी बजावली.
Leave A Reply

Your email address will not be published.