नाशिक/एनजीएन नेटवर्क
रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स आणि सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवारी ( दि. ३ ) औरंगाबादकर सभाएन नेटवर्क गृहात सायंकाळी 6.30 वाजता विख्यात मेंदू व मज्जारज्जू विकार तज्ज्ञ डॉ. महेश करंदीकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर, प्रकल्प संयोजक विश्वास शिंपी आणि नरेन्द्र शाळीग्राम यांनी दिली.
2023-24 या वर्षात रोटरीने ‘मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य’ या संकल्पनेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.विविध व्यवसायातील ताण-तणावांचे नियोजन करणे, त्यात सुधारणा घडवून आणणे यावर रोटरीचा भर आहे. 3 सप्टेंबरच्या व्याख्यानात डॉ. महेश करंदीकर त्याच विषयाला अनुसरून ‘मानसिक आरोग्य आणि जीवनशैली’’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांनी त्यांच्या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही ब्राम्हणकर, शिंपी आणि शाळीग्राम यांनी केले.