नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
समाजात संगीत आणि कलेचा प्रचार करण्याच्या उद्देशाने मुहूर्तमेढ रोवलेल्या बाबाज थिएटर्स स्थापनेला यंदा १७ सप्टेंबर रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. 17 सप्टेंबर 2000 रोजी स्थापलेल्या या व्यासपीठाच्या माध्यमातून शेकडो संगीतकार, गायक, गायिका, नर्तिका, नाट्यकलाकार, आणि ललित कला क्षेत्रातील कलाकारांना समाजात प्रोत्साहन देण्यात आले आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटातील आघाडीच्या नावांसह अनेक भारतीय स्तरावरील सेलिब्रेटी अभिनेता व अभिनेत्रींनी ‘बाबा स्टेटस’ च्या माध्यमातून आपली वाटचाल केली आहे.
रोटरी क्लब ही एक आंतरराष्ट्रीय सामाजिक सेवा संस्था जी सामाजिक सेवेद्वारे जगभरातील लाखो लोकांच्या जीवनात सेवा करीत आहे. रोटरी क्लब बाबाज थिएटर्स सोबत एकत्र आले आहेत आणि या अतिशय उत्साहात हा रौप्य महोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्ताने 13 ते 18 सप्टेंबर 2025 कालावधीत पाच दिवसांचा भव्य सांस्कृतिक महोत्सव “रोटरी कल्चरल फेस्टिवल 2025” चे आयोजन करण्यात आलेले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन सामानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, प्रमुख सचिव सुरेश गायधनी, कार्याध्यक्ष संजय करंजकर, संचालक प्रेरणावेळी तसेच रोटरीन ज्ञानेश्वर शेवाळे (3030 प्रांतपाल), दत्तात्रय देशमुख रमेश मेहेरे व आशा वेणूगोपाळ( माजी प्रांतपाल) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या दिवसांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे.
13 सप्टेंबर=
फेस्टिवल चे उद्घाटन आणि झी मराठी प्रस्तुत “उत्सव नात्याचा” संगीत ,नृत्य व सिरीयल मधील कलाकारांचा प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद हा कार्यक्रम संयोजन अमोल पाळेकर..
14 सप्टेंबर =
चेरी बेरी लाइव्ह, मुंबई सादर करत आहे “लग जा गले “हा विशेष संगीतमय कार्यक्रम. संगीतकार मदन मोहन यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त.
नागपूर मधील सुप्रसिद्ध गायिका सुरभी डोमणे प्रसिद्ध तबलावादक सचिन डोमणे आणि सहकलाकार यांचे सादरीकरण.
15 सप्टेंबर=
फोर्थ वर्ल्ड स्कूल ऑफ ड्रामा प्रस्तुत” डोळे नसलेला अर्जुन” सादरीकरण दिलीप काळे, भरत कुलकर्णी/ लेखन व दिग्दर्शन रोहित पगारे.
16 सप्टेंबर =
द गोल्डन व्हॉइस स्टुडिओ निर्मित “द गोल्डन एरा” या संगीतमय कार्यक्रमात गीता दत्त, लतादीदी, आशाताई, मन्ना डे, मुकेश, हेमंत कुमार, मोहम्मद रफी व किशोर कुमार यांची गाणी.
17 सप्टेंबर=.
“रौप्य महोत्सवी सोहळा” व “बाबाज थिएटर्स(25 वर्षपूर्ती वर्धापन दिन)” विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत, काही मान्यवरांचा सत्कार आणि दिल्ली मंच प्रस्तुत व उदय प्रकाश कृत” तिरीच्छ “या हिंदी नाटकाचे सादरीकरण
18 सप्टेंबर=
बाबाज थिएटर्स निर्मित अमोल पाळेकर प्रस्तुत
“आपली आवड” या प्रशांत जुन्नरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला महाराष्ट्रभर गाजत असलेला मराठमोळ्या गाण्यांचा कार्यक्रम.
महोत्सवाचे नियोजन रोटरीयन आशा वेणूगोपाल(मुख्य संरक्षक), प्रशांत जुन्नरे (बाबाज थिएटर्स चे संस्थापक), ज्ञानेश वर्मा ( महोत्सव संयोजक) अमोल पाळेकर ( महोत्सव संकल्पना व संगीत संयोजन) यांचे असून रोटरीन कुणाल शर्मा (महोत्सव रोटरी लेव्ह संयोजक) आर टी एन अश्विनी सर देशमुख आणि आरटीएन दिलीप काळे( महोत्सव समन्वयक). तसेच बाबाज थिएटर्स समन्वय समितीचे कैलास पाटील, प्रीतम पावशे, प्रीतीश कुलकर्णी, शामराव केदार, जे.पी जाधव, दिलीप सिंह पाटील, राजा पाटेकर, सौ योगिता पाटील, एनसी देशपांडे, मिलिंद जोशी यांनी रसिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रम दररोज सायंकाळी 6.15वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे सादर होणार असून या विनामूल्य कार्यक्रमाचा आस्वाद सर्व रसिकप्रेमींनी घेऊन बाबा थिएटर्सने केलेल्या अविरत 25 वर्षाच्या कलेच्या आसक्तीला मानवंदना देतील. तपशिलासाठी प्रशांत जुन्नरे 9850609062 , ज्ञानेश वर्मा 960709699 या क्रमांकावर संपर्क साधावा
Comments are closed.