NGN News
Latest Marathi News

प्रभाग क्रमांक १५ मधील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

  • बनकर चौक ते म्हसोबावाडी, बनकर मळा ते रॉयल मेडिकल रस्ता होणार ‘मॉडेल’ स्वरुपाचा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महापालिका प्रभाग क्रमांक १५ मधील बनकर चौक ते म्हसोबावाडी, बनकर मळा ते रॉयल मेडिकल या विस्तारित रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. सद्यस्थितीत पाच मीटर रुंदी असलेल्या या रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात येणार असून तो दहा मीटरचा करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेविका सीमा पवार यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती. मात्र प्रशासकीय राजवट संपून लोकप्रतिनिधी राज येताच विस्तारित रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रभागाचे नगरसेवक तथा माजी उपमहापौर प्रथमेश गीते, सीमा पवार आणि सचिन मराठे यांच्या उपस्थितीत शुभारंभी सोहळा पार पडला. हा रस्ता मॉडेल स्वरुपात रुपांतरीत करण्यात येणार असल्याची माहितीही नगरसेविका सीमा पवार यांनी दिली. दरम्यान, रस्ता विस्तारीकरण कामाचा श्रीगणेशा झाल्यामुळे प्रभागातील जनतेत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळात प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यात येईल, अशी ग्वाही तीनही नगरसेवकांनी यावेळी दिली.

याप्रसंगी यादव बनकर, भूषण महाजन, लक्ष्मण अमृतकर, हरिभाऊ जाधव, नाना शिलेदार, शकुंतला जोशी, राणे, शैलेंद्र बनकर आदींसह प्रभागातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

———

@ महापालिका निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांची शत-प्रतिशत पूर्तता केली जाईल. प्रभाग क्रमांक १५ चा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा संकल्प आहे. यासाठी आम्ही तीनही नगरसेवक परस्परांच्या सहमतीने पुढील पाचही वर्षे कार्यरत राहून विकासाची गंगा आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.

  • सीमा पवार, नगरसेविका


Comments are closed.