- उत्कृष्ट भाषणासाठी तेजस भामरे व शिवराज कुंटे यांना प्रमाणपत्र
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
विद्यालयाचे संस्थापक डॉक्टर अगस्टीन पिंटो, संस्थापिका डॉ. ग्रेस पिंटो यांच्या मार्गदर्शनाद्वारे नाशिक मधील सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर, सेंट फ्रान्सिस हायस्कूल तिडके कॉलनी, रॉयल इंटरनॅशनल स्कूल डीजीपी नगर, रायन इंटरनॅशनल स्कूल ओझर या चारही विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रिझुमन परिषदेचे आयोजन रायन इंटरनॅशनल स्कूल डी जे पी नगर येथे करण्यात आले होते. यात सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगरच्या सोळा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
जागतिक आरोग्य संघटना(WHO ) द्वारे नोंदवलेल्या निरीक्षणा नुसार आजच्या बदलत्या काळात बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे वाढत स्थूलता विद्यार्थ्यांन वाढत असलेला ताणतणाव तसेच विद्यार्थ्यांमधील मधील वाढत असलेले मोबाईलचे आकर्षण हा या परिषदेचा प्रमुख अजेंडा ( कार्य सूची विषय ) यात सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणे नगरच्या पुढील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे देशाचे प्रतिनिधित्व केले व या विषयावर आपले मत व्यक्त केले. यात पुढील विषय विद्यार्थी सहभागी झाले होते. तेजश्री जाधव, शिवराज कुंटे, तेजस भामरे, आरोही कोरी, सादिक शेख, मेहरीन शेख, अग्रिमा सिंग, मानसी विश्वकर्मा, मेगेद गवळी, काव्या सिंग, लक्षिता बच्छाव, रिया, साई मंजिरी या विद्यार्थ्यांनी चीन ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका ब्राझील कॅनडा सिंगापूर या देशांचे प्रतिनिधित्व केले. यासाठी त्यांना या परिषदेच्या प्रमुख शारदा भारुडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या परिषदेत उत्कृष्ट भाषणासाठी तेजस भामरे व शिवराज कुंटे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या परिषदेत परिषदेच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभाग प्रमुख भाग्यश्री मराठे यांनी प्रयत्न
केले.
Comments are closed.