· चेतकची सिग्नेचर मेटल बॉडी असलेली स्टायलिश आणि वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर असून या स्कूटरमध्ये 2.5 केडब्ल्यूएच बॅटरी आहे आणि ही स्कूटर 113 किमीपर्यंतची रेंज देते.
· 91,399 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) किमतीत उपलब्ध असलेली नवी चेतक सी25 ही देशभरातील सर्व चेतक स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार आहे.
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
बजाज ऑटो या जगातील सर्वात व्हॅल्यूएबल टू-व्हीलर आणि थ्री-व्हीलर कंपनीने आज ऑल-न्यू चेतक सी25 लाँच केल्याचे जाहीर केले. या निमित्ताने चेतकच्या पोर्टफोलिओमध्ये एक स्टायलिश, स्लीक आणि यूथफुल भर घालण्यात आली आहे. सुलभ प्रवासासाठी डिझाइन करण्यात आलेल्या चेतक सी25च्या निमित्ताने चेतकची भक्कमता, टिकाऊपणा आणि विश्वासार्हता ही मूलभूत मूल्ये जशीच्या तशी कायम ठेवत ब्रँडला एक तरूण, कूल ओळख मिळाली आहे. या स्कूटरमुळे सुलभ व सहज राइडिंगचा अनुभव मिलतो. त्यामुळे रोजचा प्रवास सोपा आणि विनासायास होतो.गर्दीच्या रस्त्यांतून सहज आणि स्टायलिशरीत्या मार्ग काढता यावा या उद्देशाने तयार करण्यात आलेली चेतक सी25 बदलत्या शहरी जीवनशैलीला अनुरूप आहे. प्लास्टिक आणि फायबर स्कूटर्स मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बाजारपेठेत चेतकला कुटुंबे, तरुणाई, महिला आणि तरुण जोडप्यांमध्ये एक भक्कम स्थान प्राप्त झाले आहे. कारण या स्कूटरची भक्कम रचना, राइडिंगचा आरामदायी अनुभव आणि टिकाऊपणा हे तीनही घटक रायडर्सना भावतात. घरांमध्ये एकापेक्षा जास्त स्कूटर वापरण्याचा ट्रेंड वाढत असताना,सी25 कोणतीही तडजोड न करता स्वतंत्र मोबिलिटीची गरज पूर्ण करते.
शहरासाठी डिझाइन करण्यात आलेली आणि तुमच्या स्टाइलला साजेशी असलेली चेतक सी25 ही निओ-क्लासिक डिझाइन भाषेत स्लीक आणि आधुनिक अवतारात सादर झाली आहे. प्रीमियम मेटल बॉडी, उत्कृष्ट पेंट फिनिश, सिग्नेचर डीआरएल हेडलॅम्प, जॉइंट्सविना असलेली मोनो-बॉडी रचना आणि आकर्षक रंगांचे पर्याय यांमुळे या स्कूटरला स्वच्छ, सुसंगत आणि ठळकपणे प्रीमियम असा लुक प्राप्त झाला आहे. स्कूटरची कॉम्पॅक्ट रचना, सहज चालवता येईल, अशी रचना यामुळे ट्रॅफिक आणि अरुंद शहरी जागांमध्येही ही स्कूटर सहज चालवता येते. त्यामुळे सी25 च्या “राइड ईझी” या मूलभूत वचनबद्धतेला अधिक बळ मिळते. चेतक सी25 सहा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असून तरुणाईला भावणाऱ्या स्ट्रीट-आर्ट प्रेरित ग्राफिक्ससह सादर करण्यात आली आहे.2.5 केडब्ल्यूएच बॅटरीवर चालणारी चेतक सी25 ही 113 किमीपर्यंतची रेंज, 55 किमी/तास इतका कमाल वेग आणि फक्त 2.25 तासांत 80% चार्जिंग देत रोजच्या शहरी वापरासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. 25 लिटरची बूट स्पेस दैनंदिन कामांसाठी किंवा कुटुंबासाठी आठवडाभराचे किराणा सामाना ठेवण्यासाठी पुरेशी जागा देते. हिल होल्ड असिस्ट, गाइड मी होम आणि डिस्क ब्रेक्ससारख्या प्रीमियम फीचर्समुळे चेतक सी25 मध्ये चालविण्यास अधिक सुरक्षित आणि वापरण्यास अधिक सोपी झाली आहे.
35 आणि 30 सिरीजसोबतच आता चेतक सी25 ची पर पडल्यामुळे विविध प्रकारच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करणारा चेतकचा पोर्टफोलिओ आता अधिक परिपूर्ण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक वापरकर्त्याच्या गरजा पूर्ण करणारी सुयोग्य चेतक उपलब्ध आहे. चेतकच्या व्यापक सर्व्हिस नेटवर्कच्या पाठबळावर सी25 मध्ये कॉम्पॅक्ट आकार आणि विश्वासार्ह टिकाऊपणाची सांगड घालण्यात आली आहे. परिणामी, पहिल्यांदा ईव्ही खरेदी करणाऱ्यांसाठी तसेच शहरातील दैनंदिन वापरासाठी घरात दुसरी स्कूटर जोडणाऱ्या कुटुंबांसाठीही ती आकर्षक पर्याय ठरते.
या लाँचच्या वेळी बजाज ऑटो लिमिटेडच्या अर्बनाइट बिझनेस विभागाचे प्रेसिडेंट एरिक वास म्हणाले, “चेतक सी25 म्हणजे कमी अंतराचे प्रवास, अरुंद रस्ते आणि स्वतंत्रपणे प्रवास करण्याची वाढती गरज या आजच्या शहरी वाहतुकीमध्ये होत असलेल्या बदलांचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. या स्कूटरचा अवतार कॉम्पॅक्ट आणि आधुनिक असला तरी चेतकची भक्कमता, टिकाऊपणा आणि विश्वासार्हता ही मूलभूत ओळख तशीच कायम आहे. चेतक सी25 मुळे चेतकचा पोर्टफोलिओ अधिक तरुण आणि वेगवान वापरासाठी विस्तारता येतो, त्याचप्रमाणे ब्रँडने अनेक पिढ्यांपासून जपलेला विश्वास आणि आत्मविश्वास कायम राखला जातो.”
Comments are closed.