NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

राज्यातून मान्सून परतीच्या प्रवासाला; ४५ टक्के भागातून माघार..

0

पुणे/एनजीएन नेटवर्क

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवेतील आर्द्रता कमी झाली असून शुक्रवारी नागपूर, पुणे आणि मुंबई या तीन प्रमुख शहरातून मान्सून परतल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने दुपारी जाहीर केले.मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सध्या अनुकूल वातावरण असल्याने गेल्या दोन दिवसात मान्सूनने महाराष्ट्राच्या ४५ टक्के भागातून माघार घेतली आहे. 

पुढील काही दिवस राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहणार असून ढगाळ हवामान गेल्यानंतर कमाल तापमान हळूहळू वाढणार, रात्रीचे तापमान हळूहळू कमी म्हणजेच थंडी जाणवणार आहे. राज्यातील ४५ टक्के भागातून मान्सून परतला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात संपूर्ण राज्यातून मान्सून बाहेर पडेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.  दोन दिवसांपासून शहरातील वातावरण एकदम बदलले असून उन्हाची तीव्रता वाढली आहे. दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके जाणवत आहेत. तर रात्री गारवा जाणवतो आहे. शहरात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पहाटे धुके पसरले होते. दरम्यान, पुणे आणि परिसरात पुढील दोन आकाश मुख्यत: निरभ्र आणि हवामान कोरडे राहणार आहे. संध्याकाळी अशंत: ढगाळ राहण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.