NGN News
Latest Marathi News

लोहोणेर सरपंचपदी रेश्मा महाजन बिनविरोध; समर्थकांचा जल्लोष

लोहोणेर : पंडित पाठक

राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या देवळा तालुक्यातील लोहोणेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.रेश्मा रमेश महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लोहोणेर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. मोहिनी अनिल आहेर यांनी आवर्तन पद्धती नुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी सौ. रेश्मा रमेश महाजन यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे निवडणूक अध्याशी अधिकारी तथा मंडळ अधिकारी एम. के. गांगुर्डे यांनी जाहीर केले. यावेळी एकूण १७ सदस्य पैकी १२ सदस्य बैठकीस हजर होते तर ५ सदस्य गैरहजर होते.

सरपंच निवडीसाठी बोलविण्यात आलेल्या या बैठकीला उपसरपंच सौ. प्रतिभा सोनवणे, सदस्य सतिष सोमवंशी, निंबा धामणे, रतीलाल परदेशी, चंद्रकांत शेवाळे, धोंडू, आहिरे, भाऊसिग गायकवाड, श्रीमती विजया मेतकर, सौ. मोहिनी आहेर, सौ. पूनम पवार, उषाबाई सोनवणे, बाळासाहेब बच्छाव, आबासाहेब देशमुख, मंगलचंद जैन, अशोक अलई, दिगंबर कोठावदे, काशिनाथ धामणे, नानभाऊ जाधव, प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा, वसंत शेवाळे, श्रीमती सुलोचना शेवाळे, अनिल आहेर, राजेंद्र धामणे, दिपक देशमुख, महेंद्रसिंग परदेशी, विठ्ठल बागुल, मधुकर आहिरे,हिरामण निकम, हरिभाऊ परदेशी, धनराज शेवाळे, ज्ञानेश्वर बागुल, योगेश पवार, भैय्या देशमुख, सोमनाथ शेवाळे, प्रभाकर आहिरे, समाधान महाजन, सचिन आहिरे, गोरख बागुल, आप्पा पवार, दावल खैरनार, दशरथ शेवाळे, जाकीर शेख, सोपान सोनवणे, नाना जगताप,राजेंद्र महाजन, योगराज महाजन, संदीप महाजन, भगवान सोनवणे, आदींसह ग्रामविकास अधिकारी संदीप खेबडे, भूषण आहिरे, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पंडीत पाठक, योगेश पवार, प्रसाद देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर रमेश आहिरे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी गुलाल उधळून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. आगामी होणाऱ्या निवडणुकीत थेट सरपंचपदाची निवड होणार असल्याने यावेळी कोण सरपंच पदी कोणाची निवड होते, याकडे लोहोणेरकरांचे लक्ष केंद्रित झाले होते.

Comments are closed.