NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके कालवश; ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यावरून मुंबईला एका बैठकीसाठी येत असताना सकाळी त्यांना हृदयविकाराच्या झटका आला. त्यानंतर वांद्रे येथील एशिअन हार्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. 

महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन, व्याख्याते म्हणून नरके सुपरिचित होते. तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख होते. महात्मा फुले साहित्य समितीवर त्यांनी काम केले. त्या माध्यमातून महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.