नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये थोर समाजसेवक भिकुसा यमासा क्षत्रिय यांच्या ७१व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित ‘भिकुसा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी हा भिकुसा दिन महाविद्यालयाचा ६८ वा वर्धापन दिनही ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व खजिनदार डॉ. दीप्ती देशपांडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी तसेच क्षत्रिय कुटुंबीयांचे प्रतिनिधी गौतम शेठ क्षत्रिय, . प्राचार्य डॉ. लीना भट, आचार्य लक्ष्मीकांत जोशी, शैलेश गोसावी, डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, डॉ. के. आर. शिंपी व श्री. कल्पेश गोसावी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात भिकुसा बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर प्राचार्य डॉ. लीना भट यांनी कार्यकमाचे प्रास्ताविक केले. डॉ. राम कुलकर्णी व नीता कुलकर्णी यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन आरुषी प्रकाशनच्या माध्यमातून अतिथींच्या हस्ते करण्यात आले. ह्या प्रसंगी महाविद्यलयाचा वार्षिक अंक “व्यवहार” चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
तसेच देणगीदार कुटुंबियांतर्फ गौतम शेठ क्षत्रिय यांनी मनोगत व्यक्त केले आपल्या मनोगतात त्यांनी भिकुसा क्षत्रिय यांचा जीवनपट उलगडून त्यांचे उद्योग क्षेत्रातील योगदान सांगितले . तसेच विभागीय सचिव डॉ . राम कलुकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले . यावेळी समाजातील विविध क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिव पार्वती प्रतिष्ठान तर्फे बी.कॉम व एम.कॉम टॉपर्स, यशस्वी उद्योजक, गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सेवाभावी शिक्षकांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी बी .वाय .के . महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा प्रकाश निकम यांना गौरविण्यात आले . शिवपार्वती प्रतिष्ठान व गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे सन्मानपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचा मुख्य आकर्षणाचा भाग होता ,आचार्य लक्ष्मीकांत जोशी यांचे “स्वकर्म कुसुमांची माला” या विषयावर स्मृती व्याख्यान. त्यात त्यांनी भक्तीमार्गातील नवविधा भक्तीवर विवेचन करत अध्यात्मिक विचार मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. दीप्ती देशपांडे यांनी भिकुसा बाबांच्या कार्याचा गौरव करत संस्थेच्या भावी वाटचालीबाबत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच गो .ए . सोसायटी तर्फे पीएचडी व पेटंट मिळविलेले प्राध्यापक तसेच सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले . कार्यक्रमाला संस्थेचे देणगीदार , विविध महाविद्यालयाचे प्राचार्य , प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते . ह्या कार्यकमाचे सूत्रसंचालन डॉ . स्नेहा रत्नपारखी यांनी केले तर प्रा. डॉ. सुवर्णा कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Comments are closed.