नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
देशातील सर्वात महागडे वकील आणि भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे तिसऱ्यांदा बोहल्यावर चढले आहेत. नुकतेच त्यांनी वयाच्या 68 व्या वर्षी रविवारी लंडनमध्ये तिसरे लग्न केले. साळवेंच्या तिसऱ्या पत्नीचे नाव त्रिना असे असून त्या केंद्र सरकारच्या नव्याने स्थापन झालेल्या वन नेशन-वन निवडणूक समितीच्या सदस्य आहेत. त्या मूळ ब्रिटिश आहेत.
लग्नाला नीता अंबानी, ललित मोदी आणि उज्ज्वला राऊत यांच्यासह जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
साळवे यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. हरीश साळवे 2020 मध्ये पहिली पत्नी मीनाक्षीपासून वेगळे झाले. त्यांना साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत. 38 वर्षीय मीनाक्षीपासून विभक्त झाल्यानंतर काही महिन्यांतच त्याने कॅरोलिनशी दुसरे लग्न केले. कॅरोलिनचेही हे दुसरे लग्न होते. आता तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत हरीश साळवे यांनी तिसरे लग्न केले आहे. कॅरोलिनसोबत लग्न करण्यापूर्वी हरीश साळवे यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यांच्या लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी हे धर्मांतर झाले. सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे साळवे अनेक हाय-प्रोफाइल केसेसमध्ये वकील आहेत.