मुंबई/एनजीएन नेटवर्क
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी लिलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुंदर चेहरा, मनमिळावू स्वभाव, गोड हास्य आणि दर्जेदार अभिनय यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मराठी रसिक प्रेक्षक चाहते होते.
आपल्या परिवाराच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यानं त्यांनी सिनेचित्रपटसृष्टीतून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. रमेश देव आणि सीमा देव यांची जोडी एव्हरग्रीन मानली जायची. गेल्या 59 वर्षांचा त्यांचा सहवास होता. गेल्या वर्षी रमेश देव यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांच्या अकाली जाण्याने पोकळी निर्माण झाली होती. आनंद, जगाच्या पाठीवर,यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केलं.सीमा देव यांचे पती रमेश देव हे अभिनेते होते.