NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

फडणविसांच्या आश्वासनाचा दाखला देत आता ‘या’ समाजाचे उपोषणास्त्र

0

नगर/एनजीएन नेटवर्क

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंदोलन आक्रमक बनले असताना आता धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटला आहे. यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून (६ सप्टेंबर) चौंडीत बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा, त्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा यशवंत सेनेचे राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची सत्ता येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत या आंदोलनातही फडणवीस यांनाच लक्ष्य केल्याचे आढळून आले.

त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचीही डोकेदुखी वाढणार आहे. याशिवाय जालना जिल्ह्यात जशा राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या, तशाच चौंडीत धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या ठिकाणीही दिल्या जाणार आहेत. 

@ धनगर आरक्षण मिळण्यासाठी आम्हाला भाजपच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहे. या केंद्र सरकारने ३७० वे कलम हटविले, राम मंदिराचा दीर्घकाळ रेंगाळलेला प्रश्न सोडविला, जे कधी सुटणार नाहीत असे वाटणारे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सोडविले आहेत. राज्यातील सरकारमध्ये भाजपला सत्ते आणण्यासाठी धनगर बांधवाचा सिंहाचा वाटा आहे. देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळी बारामतीमध्ये झालेल्या आंदोलनापुढे बोलताना फडणवीस म्हणाले होते की धनगर आरक्षणाचा माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे. आमचे सरकार आले की पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न मार्ग लावू. मात्र, फडणवीस यांनी पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला, आता दुसऱ्यांचा सत्ता मिळाली आहे. तरीही आमची मागणी मान्य झालेली नाही. आरक्षणाशिवाय धनगर समाजाच्या इतरही अनेक प्रश्न आहेत, तेही सोडविण्याची आमची मागणी आहे.

  • बाळासाहेब दोडतले, अध्यक्ष, यशवंत सेना
Leave A Reply

Your email address will not be published.